SHRI AMBADEVI SANSTHAN, AMRAVATI



AMBADEVI TEMPLE HISTORY




श्री अंबा देवी ..श्री अंबामाई.......


विदर्भाची कुलस्वामिनी ...

अमरावतीचे ग्रामदैवत हजारो कुटुंबांची कुलदेवता अमरावती नगरीचे ओळख पार्वती स्वरूप श्री अंबाबाईच्या नावाने होते यात अतिशय युक्ती नाही.

अशा या श्री अंबादेवीच्या मूर्तीचा इतिहास हा महाभारत काळापासून असल्याचे इतिहासकार सांगतात. अर्थात त्यासाठी थोडेसे पौराणिक काळाकडे जावे लागेल. ........

महाभारत काळात संपूर्ण भारत वर्षातून संत ऋषी महात्मे हे अनंत व्रत हे अतिशय कठीण व्रत करायला विदर्भ प्रदेशात येत. त्यावेळी विदर्भ प्रदेशाची राजधानी ही अमरावती शेजारील कुंडीनपूर (आता कौंडण्यपूर या नावाने ओळखले जाते) आणि याच विदर्भाचा राजा भीष्मक, त्याची कन्या रुक्मिणी... शिशुपालाशी ठरलेला विवाह मंजूर नसल्याने आणि मनोमन भगवान श्रीकृष्णाला पती म्हणून मानल्याने रुक्मिणीने सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हस्ते श्रीकृष्णाला पत्र पाठवून माझे हरण करून घेऊन जा असे कळवले.

शिशुपाला शी ठरलेल्या विवाहासाठी कुळप्रथेप्रमाणे रुक्मिणी कुलदेवता असलेल्या याच श्री अंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी अंतपुरातून आली. भगवान श्रीकृष्ण आधीच येऊन पोहोचले होते याच श्री अंबा देवी समोर त्यांनी रुक्मिणीचे पाणीग्रहण करून तिचे हरण करून द्वारकेला प्रस्थान केले. (संदर्भ श्रीमद् भागवत दशम स्कंद अध्याय 53 वा)

अशा या ऐतिहासिक सुवर्णजडीत श्री अंबा देवीच्या मंदिराची तत्कालीन मोगली, निजाम आदी आक्रमकांनी लुटमार करून उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

पण परिसरातील लोकांची प्रघाढ श्रद्धा असल्याने मूर्ती कशीतरी शाबूत राहिली. पुढे सतराव्या शतकात थोर तपस्वी श्री जनार्दन स्वामी जे श्री अंबा देवीचे परमभक्त होते त्यांनी श्री अंबा देवीची प्रतिष्ठापना करीत मंदिराचे पुनः निर्माण केले.

बालकामय किंवा बेसॉल्ट रॉक पासून बनवलेली ही मूर्ती अर्धोन्मिलीत नेत्र, स्मितहास्य, तसेच पद्मासन अवस्थेत स्थानापन्न आहे पुरातत्व विभागातील तज्ञानुसार अंदाजे साडेपाच हजार वर्षे जुनी असावी.

नवसाला पावणारी तसेच हजारो लोकांना आपल्या कृपाप्रसादाची प्रचिती देणाऱ्या या श्री अंबा देवीची दिनचर्या रोज सकाळी पाच वाजता सनईच्या मंजुळ स्वराने सुरू होते. अभिषेक सहस्त्रधारा अभिषेक षोडोषोपचार पूजा झाल्यानंतर देवीचा पूर्ण साज शृंगार केला जातो.

रोज जवळपास सहा ते सात पातळी नेसवली जातात. मग आरती होऊन भाविकांसाठी मंदिर सकाळी सहा वाजल्यापासून खुले होते. दुपारी बाराचे सुमारास महाप्रसाद व आरती होते.
सायंकाळी पुन्हा महाआरती व रात्रीची शेजारती होऊन रात्री दहाचे सुमारे दर्शन व्यवस्था बंद होते. वर्षभरात चैत्र, अश्विन, कार्तिकोत्सव साजरे होतात. यात प्रामुख्याने अश्विनी उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर होतो. विजयादशमीला देवी हर्षोत्साहत लाखो भक्तांसमवेत श्री अंबा देवी भव्य मिरवणुकीने सिमोल्लंघनाला प्रस्थान करते.

कार्तिकोत्सव समाप्तीचे वेळेस ही श्रीदेवी नगर परिक्रमेला निघते. याशिवाय वर्षभर भजन, कीर्तन उत्सव अभिषेक, प्रवचने व अन्य धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. श्री अंबा देवी संस्थान हा रजिस्टर्ड ट्रस्ट असून चॅरिटी कमिशनर यांचे देखरेखित सर्व शासकीय नियमांचे पालन करीत आर्थिक व धार्मिक व्यवहार होतात.

सामाजिक बांधिलकीला श्री अंबादेवी संस्थानने धार्मिक कार्यक्रमा एवढेच महत्त्व दिले असून त्या अंतर्गत

  • १ श्री अंबादेवी हॉस्पिटल

  • २ श्री अंबादेवी ग्रंथालय

  • ३ श्री अंबादेवी स्पर्धा परीक्षा अध्ययन कक्ष

  • ४श्री अंबादेवी संस्कृत विद्यालय

  • ५श्री अंबादेवी शास्त्रीय संगीत समारोह

  • याशिवाय पांडवकालीन स्थापित श्री देवी पॉइंट चिखलदराचे परिचालन ही केले जाते.

  • याशिवाय मंदिर परिसरात भक्तांसाठी 24 खोल्यांचे सुसज्ज असे भक्तनिवास ही उपलब्ध आहे.


Copyright © Shri Ambadevi Sansthan
Designed By Pawgi Infotech Services